नाशिक : नदीत उलटली रुग्णवाहिका, सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

नाशिक : नदीत उलटली रुग्णवाहिका, सुदैवाने जीवितहानी टळली

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे पुलावरून कोलथी नदीत रुग्णवाहिका कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि.२६) दुपारी १२.३० च्या सुमारास चांदवड येथील सप्तश्रृंगी रुग्णवाहिका खर्डे (ता. देवळा) येथे रुग्ण घेण्यासाठी जात असताना रामेश्वर गावाजवळील पुलावरून कोलथी नदीत कोसळली. यात चालकासह एक जण होता. दोघे जण रुग्णवाहिकेच्या दरवाजातून बाहेर निघाले. रामेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन पगार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीत कोसळलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी मदत केली.

हेही वाचा :

Back to top button