पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भैय्या भरत गायकवाड (रा. पाचोरा) याला १० वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हि शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन .माने यांनी सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ७ मार्च २०१८ रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (वय-२२, रा. पाचोरा) या तरूणाने पिडीत मुलीला मोबाईलवर गेम खेळायला चल, असे सांगून आपल्या घरात नेले. आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन.माने यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला.
यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. यात भैय्या भरत गायकवाड याला दोषी ठरवून न्या. माने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा :