कोल्‍हापूर : पोलिस असल्‍याचे भासवून सोन्‍याची अंगठी पळवली | पुढारी

कोल्‍हापूर : पोलिस असल्‍याचे भासवून सोन्‍याची अंगठी पळवली

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा

पोलिस असल्‍याचे भासवून वृद्धाच्‍या हातातील अंगठी घेवून भामट्याने पोबारा केला. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय ते शासकीय विश्रामगृह या रस्‍त्यावर सायंकाळी सातच्‍या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत धुंडीराज कृष्‍ण छत्रे (वय ७८) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी धुंडीराज छत्रे हे सेवानिवृत्त आहेत. सोमवारी सायंकाळी वॉकसाठी घराबाहेर पडले होते. धैर्यप्रसाद चौकापासून काही अंतरावर गेले असता ३५ ते ४० वयोगटातील एक तरुण त्‍यांच्‍याजवळ आला. स्‍वत: लक्ष्‍मीपुरीचा पोलिस अधिकारी असल्‍याची बतावणी करत तपास सुरु असल्‍याचे सांगितले.

तसेच गळ्यातील, हातातील दागिने गुंडाळून कागदात ठेवण्‍यास सांगितले. हातचलाखीत त्‍याने फिर्यादी छत्रे यांची अंगठी काढून घेत एक संशयिताने दगड गुंडाळून त्‍यांच्‍या खिशात टाकला. काही वेळात हा प्रकार छत्रे यांच्‍या निदर्शनास आल्‍याने त्‍यांनी शाहूपुरी पोलिसांत येऊन फिर्याद दिली.

Back to top button