DGCA Charter Rules: अजित पवारांच्या निधनानंतर चार्टर विमानांसाठी DGCAचे झिरो टॉलरन्स धोरण; नियम मोडल्यास काय शिक्षा होणार?

DGCA Charter Rules: चार्टर विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर Directorate General of Civil Aviation (DGCA) ने कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. आता उड्डाणाबाबत पायलटचा निर्णय अंतिम राहणार असून नियम मोडल्यास परवाना रद्द होऊ शकतो.
DGCA Charter Rules
DGCA Charter RulesPudhari
Published on
Updated on

DGCA Imposes Strict Charter Flight Safety Rules: अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यासोबतचं चार्टर विमान आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स दुर्घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीनंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर (NSOP) कंपन्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आणि सुरक्षेबाबत झिरो टॉलरन्स (Zero Tolerance) धोरण जाहीर करण्यात आले. या नव्या निर्णयामुळे चार्टर विमानसेवांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

गेल्या दहा वर्षांतील अपघातांचा आढावा घेतला असता, नियमांचे पालन न करणे, प्रशिक्षणातील त्रुटी आणि व्यावसायिक दबावाखाली घेतलेले निर्णय, हे दुर्घटनांचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पायलटचा निर्णय अंतिम

नव्या नियमांनुसार, उड्डाणादरम्यान कोणताही धोका जाणवल्यास पायलट-इन-कमांडचा निर्णय अंतिम मानला जाईल. हवामान बिघडले असल्यास, तांत्रिक अडचण असल्यास किंवा अन्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास पायलट विमान वळवू शकतो, उशीर करू शकतो किंवा रद्दही करू शकतो. अशा निर्णयासाठी त्याच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. म्हणजेच व्यावसायिक दबावामुळे सुरक्षेशी तडजोड होणार नाही, असा स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे.

पारदर्शकता वाढविण्याचा निर्णय

ग्राहकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ‘Mandatory Disclosure Policy’ लागू करण्यात आली आहे. प्रत्येक NSOP ऑपरेटरला आपल्या संकेतस्थळावर विमानाचे वय, देखभालीचा इतिहास आणि पायलटचा अनुभव स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक असेल. याशिवाय, सर्व ऑपरेटर्सची ‘सेफ्टी रँकिंग’ तयार करून ती सार्वजनिक केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानाची सर्व माहिती मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अपघात झाल्यास केवळ पायलटला दोष देऊन चालणार नाही. वरिष्ठ व्यवस्थापन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. यामुळे व्यवस्थापनावर अधिक जबाबदारी असणार आहे.

काय शिक्षा होणार?

DGCA ने तपासणीची प्रक्रिया अधिक कडक केली आहे. याद्वारे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचे (CVR) रँडम ऑडिट केले जाईल. तसेच चुकीची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटचे (FDTL) उल्लंघन करणाऱ्या किंवा सुरक्षेच्या मर्यादेपेक्षा खाली विमान उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पायलटचे परवाने पाच वर्षांपर्यंत निलंबित केले जाऊ शकतात. जुनी विमाने आणि अलीकडे बदललेली विमाने यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

DGCA Charter Rules
Virus Outbreak 72 tigers death | थायलंडमध्ये विषाणूच्या संसर्गाने 72 वाघांचा मृत्यू

हवामान आणि प्रशिक्षणावर विशेष भर

अनेक अपघात हे प्रतिकूल हवामानात चुकीचे निर्णय घेतल्यामुळे घडले असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे सर्व ऑपरेटरसाठी रिअल-टाइम वेदर अपडेट प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. पायलट प्रशिक्षणात निर्णयक्षमता विकसित करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे, विशेषतः अनियंत्रित आणि धोकादायक परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यावा यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मार्च 2026 पासून सर्व NSOP ऑपरेटरचे सेफ्टी ऑडिट सुरू केला जाणार आहे. या प्रक्रियेत सुरक्षेच्या प्रत्येक बाबीची तपासणी केली जाईल.

DGCA Charter Rules
ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये शॉटगन घेऊन घुसणारा तरुण कारवाईत ठार

या निर्णयांमुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विमान प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news