Virus Outbreak 72 tigers death | थायलंडमध्ये विषाणूच्या संसर्गाने 72 वाघांचा मृत्यू

चियांग माईतील पर्यटनस्थळांवर मोठी आपत्ती
Virus Outbreak 72 tigers death |
Virus Outbreak 72 tigers death | थायलंडमध्ये विषाणूच्या संसर्गाने 72 वाघांचा मृत्यूPudhari File Photo
Published on
Updated on

बँकॉक; वृत्तसंस्था : थायलंडच्या उत्तर भागातील चियांग माई प्रांतात दोन प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर - टायगर किंगडम माए रिम आणि माए टाएंग - एका अत्यंत संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी महिन्यात पिंजर्‍यातील 72 वाघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना थायलंडच्या वन्यजीव इतिहासातील सर्वात मोठी सामूहिक वाघांच्या मृत्यूची घटना मानली जात आहे. या दोन्ही सुविधांमध्ये एकूण 246 वाघ होते, त्यापैकी 72 वाघांचा मृत्यू झाला असून, उर्वरित वाघांना वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

8 फेब्रुवारीपासून या वाघांमध्ये आजाराची लक्षणे दिसू लागली होती. हे मृत्यू मुख्यतः 8 ते 19 फेब्रुवारीदरम्यान झाले, ज्यात माए टाएंग येथे 51 आणि माए रिम येथे 21 वाघांचा समावेश आहे. या प्रादुर्भावामुळे दोन्ही ठिकाणे तात्पुरती बंद करण्यात आली असून, पर्यटकांना वाघांना जवळून पाहण्याची, स्पर्श करण्याची आणि फोटो काढण्याची परवानगी देणारी ही लोकप्रिय ठिकाणे आता निर्जन झाली आहेत.

सरकारी पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्र 5 कार्यालयाने (चियांग माई) मृत वाघांच्या नमुन्यांत कॅनाईन डिस्टेम्पर विषाणू आढळल्याचे सांगितले आहे. याशिवाय मायकोप्लाझ्मा जीवाणू हा दुय्यम संसर्ग म्हणून ओळखला गेला आहे. काही प्राथमिक अहवालांत फेलाईन पॅनल्यूकोपेनिया विषाणूचा उल्लेख होता; परंतु नंतर सीडीव्ही मुख्य कारण ठरले. पशुवैद्यकीय अधिकारी सोमचुआन रतनामुंगक्लानोन यांनी सांगितले की, वाघांना जवळून उपचार करणे कठीण असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news