धुळे : ‘ओमायक्राॅन’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू | पुढारी

धुळे : 'ओमायक्राॅन'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू

धुळे : पुढारी वृत्तसेवा

काेराेनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्राॅनचा  वाढता संसर्ग लक्षात घेता धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विवाह समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अंत्‍यसंस्कारासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात विवाह समारंभ बंद अथवा मोकळ्या जागेत आयोजित करतताना  जास्तीत 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा पाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम रद्‍द करावेत अथवा मोकळ्या जागेमध्ये 50 व्यक्तींच्‍या उपस्‍थितीत पार पाडावा. तसेच  अंत्‍यसंस्‍कारासाठी 20 लोकांची मर्यादा असेल. निर्बंधाच्या कालावधीत काही सूचना नव्याने प्राप्त झाल्यास त्याचेही अनुपालन करावे लागेल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button