नाशिक : सिडकोत दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोनाबाधित | पुढारी

नाशिक : सिडकोत दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोनाबाधित

सिडको; पुढारी वृत्तसेवा

सिडको भागातील हॉटेलमध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मनपा सिडको वैदयकीय विभागाने हॉटेलला भेट देऊन संपर्कात आलेल्या बारा कर्मचाऱ्यांचा स्वॅब घेऊन आरटीपीसीआर तपासणीसाठी पाठविला आहे. (nashik omicron patient)

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली असून, आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये व्यवसाय संदर्भात आले होते. सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

nashik omicron patient : मनपा आणि आरोग्यविभाग सतर्क

संबंधित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मनपा सिडको वैदयकीय विभागाने त्वरीत दखल घेतली. वैदयकीय अधिकारी डॉ.बाजी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी यांनी संबधीत हॉटेलला भेट दिली आहे.

संबधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ कर्मचारी यांचा आरटीपीसीआर तपासणी साठी पाठविला आहे. तसेच संपर्कात आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागातर्फे शोध घेतला जात आहे. तसेच, जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल काय येतो, या नंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती डॉ .बाजी यांनी दिली.

Back to top button