जळगाव : मिनी मंत्रालयाच्या 10 जागा वाढल्या | पुढारी

जळगाव : मिनी मंत्रालयाच्या 10 जागा वाढल्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मंत्रिमंडळाने नगरपालिका महानगरपालिकेच्या धर्तीवर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या जागांमध्ये वाढ केली आहे.  जिल्हा परिषदला १० जागा तर पंचायत समितीसाठी 20 जागा जळगाव जिल्ह्यात वाढलेले आहेत. यात कोणत्या तालुक्याला किती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदच्‍या 67 जागा होत्‍या. मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयामुळे त्यामध्ये १० जागांची वाढ होऊन ही संख्या ७७ वर गेली आहे. जागांची संख्या वाढल्यामुळे अनेक इच्छुकांची संख्याही वाढणार आहे .

तसेच पंचायत समितीच्या जळगाव जिल्ह्यात १३४ जागा होत्या त्यामध्ये २० ने वाढ होऊन ते १५४ वर गेले आहेत जळगाव जिल्ह्यात गट आणि गण यामध्ये झालेल्या वाढीव जागांमुळे अनेक नवीन चेहरे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांमध्ये दिसतील तसेच अनेकांचे गट गण यामध्ये विभागणी होणार यात काहीही शंका नाही कोणकोणते गट आणि गण विभागले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button