जळगाव : शेतकऱ्याचे ७ लाख लुटणाऱ्या ५ बदमाशांच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

जळगाव : शेतकऱ्याचे ७ लाख लुटणाऱ्या ५ बदमाशांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून पहुरकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे शेतमालाचे सात लाख रुपये घेऊन जाताना दोन मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. या गुन्ह्याप्रकारणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा माग काढत पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे.

जामनेर तालुक्यातील सोनाळा तेथील शेतकरी कापूस विक्रीचे सात लाख रुपये घेऊन 24 रोजी सोनाळावरून पहूरला जात असताना चार अज्ञात मोटरसायकलस्वारांनी अडवून चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या घटनेचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून सोनाळा गावातील गोपाळ हरी पाटीलला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर गोपाळ हरी पाटील (सोनाळा ता.जामनेर), त्याने गुन्हा कबूल केला होता व यातील अन्य आरोपींची नावे सांगितली होती.

आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जालिंदर पळे, उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. संदीप सावळे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी प्रवीण रमेश कोळी (वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रावण तेली (कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी(जुना आसोदा रोड जळगाव) याना अटक करण्यातआली.

या आरोपींनी लुटलेले सात लाख रुपये आपसात वाटून घेतले होते व काही प्रमाणात खर्च देखील केले. यांच्याकडून  4 लाख 74 हजार 460 रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, 5 मोबाईल, 2 मोटार सायकली असा एकूण 5 लाख 96 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button