

त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काही मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. दुपारपर्यंत पूर्व भागात बंद शांततेत पार पडला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास राहूलनगर भागातून एक जमाव पांजरापोळच्या दिशेने चालून आला. तो जुना मुंबई-आग्रा महामार्गावर दाखल झाला.
त्यातील काहींनी सुरू असलेले दुकाने पाहून दगडफेक केली. यातून एकच गोंधळ उडून पळापळ सुरू झाली. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळपासूनच बंदोबस्तावर असलेले पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह अतिरिक्त कुमकही धावून आली. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर जमाव राहूलनगरच्या दिशेने माघारी फिरला.
सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तहसीलदार सी. आर. राजपूत घटनास्थळी पाहणी करीत आहेत.
हेही वाचा :