नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ 

नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ 

Published on

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव माणिकपुंज रोड लगत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. कासारी शिवारात माणिकपुंज रोडलगत रामदास ईप्पर यांच्या मेंढ्याच्या वाड्याजवळ हा मृतदेह आढळून आला.

याबाबत कासारी येथील पोलीस पाटील प्रभाकर शिंगाडे यांनी पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सदर इसमाचे अंदाजे वय ४२ वर्ष असून ओळख पटल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन नांदगाव पोलीसांनी केले आहे.

मृत्यूमुखी इसमाच्या अंगात फुल बाहीचा रेघा असलेला शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, सफेद रंगाची कोपरी, भगव्या रंगाचे उपरणे,  लाल रंगाचा करदोडा आहे. या घटनेचा अधिक तपास पो. हा भास्कर बस्ते हे करीत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news