त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह दर्शनावर मर्यादा येणार, देवस्थान ट्रस्ट निर्बंध घालण्याच्या तयारीत | पुढारी

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह दर्शनावर मर्यादा येणार, देवस्थान ट्रस्ट निर्बंध घालण्याच्या तयारीत

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास केवळ सकाळी 7 वाजे पर्यंत मुभा आहे. मात्र त्यासाठी आता भाविकांची गर्दी वाढत आहे. ञ्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाची रचना पाहता एका वेळेस मर्यादीत संख्येने गर्भगृहात प्रवेश देणे शक्य होते. यासाठी आता देवस्थान ट्रस्ट निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. बाहेरगावच्या भाविकांना आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्याचा मानस काही विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.

ञ्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृह दर्शनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गर्भगृहात जागा कमी आहे. एकाच वेळी जास्तीच्या संख्येने भाविक आत गेल्यास चेंगराचेंगरी होणे, ऑक्सीजन कमी पडणे असे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामध्ये सकाळी सात वाजे पर्यंत गर्भगृहात जाण्याची मुभा देण्यात येते. त्यातही आखाडयांचे साधु आणि मागच्या अनेक वर्षांपासून नित्यक्रम पाळणारे येथील काही रहिवासी आत दर्शनास जातात. सोमवारी होणाऱ्या गर्दीमुळे वादाचे प्रसंग उद्भवल्याने याबाबत देवस्थान ट्रस्टने सकाळच्या वेळचे गर्भगृह दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साधरणत: एका दिवसाला दहा व्यक्ती सकाळच्या ठरलेल्या वेळेत गर्भगृहात दर्शनाला जाण्याचे बुकिंग करतील. त्यासाठी त्यांना देवस्थान ट्रस्ट निश्चित करेल ती देणगी पावती द्यावी लागेल. एका दिवसाचा कोटा पुर्ण झाला तर ते दुस-या दिवसासाठी बुकींगचा पर्याय उपलब्ध असेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अर्थात यामधून साधु आणि नित्यक्रम म्हणून अनेक वर्षांपासून दर्शनास येणारे रहिवासी यांना वगळण्यात आले आहे.

भाविकांनी गर्भगृहाची रचना समजावून घेणे आवश्यक आहे. एकाच वेळेस गर्भगृहात जाण्याचा अट्टहास केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.देवस्थान ट्रस्ट कर्मचा-यांना यावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे.

कैलास घुले, विश्वस्त,ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट.

हेही वाचा :

Back to top button