राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये 

राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये 
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या काजूच्या मूल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पसमध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेलनिर्मितीही सुरू करण्यात आली आहे. राज्यातील तसेच यामुळे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास मदत होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले की, जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण आघाडीवर असलो, तरी देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करू शकत नाही. इतकी या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. या संधीचे रूपांतर ताकदीच्या मूल्यवर्धित साखळीमध्ये करण्याची गरज आहे. त्यासाठी 'सह्याद्री'ने ही सुरुवात केली आहे.

काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही, तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मूल्यसाखळ्या उभ्या करण्यावर 'सह्याद्री फार्म्स' भर देणार आहे.

'सह्याद्री'चा काजू प्रक्रिया प्रकल्प

प्रतिदिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता

देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प

प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी

काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट

उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन

परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरूपी रोजगार

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news