पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दाखल होत असलेल्या पपईच्या तुलनेत मागणी वाढल्याने भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली तर मागणीअभावी खरबुजाचे भाव किलोमागे दोन रुपयांनी उतरले आहेत. गावरान पेरू, चिकूचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात गावरान पेरूसह चिकू बाजारात दाखल होऊ लागले आहेत. मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पहिल्या बहरातील सीताफळाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारातील रोडावलेली आवक कायम आहे. बाजारात बहुतांश फळांची आवक जावक कायम असून, दर स्थिर आहेत.
रविवारी (दि. 20) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 5 ट्रक, मोसंबी 60 ते 70 टन, डाळिंब 60 ते 70 टन, पपई 2 ते 3 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, पेरू 600 ते 700 क्रेट, सीताफळ 15 ते 20 टन, चिकू 600 बॉक्स इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 100-300, मोसंबी : (3 डझन): 100-200, (4 डझन) : 30-100, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 40-150, गणेश : 5-40, आरक्ता 10-50, कलिंगड : 10-15, खरबूज : 15-30, पपई : 20-25, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिकू (दहा किलो) : 100-50,सीताफळ 20-150