

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पोहोणे येथील बेपत्ता मुलाचा पाच दिवसांनंतर संशयास्पदरीत्या मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा अनिल सोनवणे (९) हा १६ तारखेला शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला. मात्र, तो नंतर परत आलाच नाही.
कुटुंबीयांनी शेतशिवारात शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्याने अखेर वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) वनविभागाच्या हद्दीतील विहिरीजवळ पुरलेल्या अवस्थेत एक मृतदेह निदर्शनास आला आहे.
हेही वाचा :