सप्तशृंगी देवी मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण | पुढारी

सप्तशृंगी देवी मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : वार्ताहर 

सप्तशृंगी गडावरील सप्तशृगी देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. रविवार (दि. ९) रोजी आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी मीना भोये या मंदिरात मुख्य प्रवेशद्वारा जवळ गर्दी नियंत्रित करण्यासाठी  उभ्या होत्या. त्याचवेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलातील वैभव शेलार हा कर्मचारी देखील होता. मात्र अचानक या कर्मचा-याने आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी मीना भोये यांच्या डोक्यात हातातील बंदुक मारली. यात मीना भोये जखमी झाल्या. भोये यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत कळवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटेनेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जॉन भालेराव यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता, त्यात जाणूनबुजून डोक्यात बंदूक मारल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांनी बंदूक धारी वैभव शेलार विरुद्ध भांदवी कलम ३२४ प्रमाणे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक नागरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस कर्मचारी शरद शिंदे, भामरे आदि करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button