Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी तत्काळ दिले ‘हे’ आदेश | पुढारी

Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी तत्काळ दिले 'हे' आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन

सप्तशृंगीगडावरील घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी यात जखमी झाले आहेत. बस अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत एसटी मंडळाकडून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

तसेच, सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर तातडीने रिफ्लेक्टर लावणे व तेथील कठड्यांची उंची वाढविणे यासंदर्भात कामे पूर्ण करावीत, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागास केले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या अपघातावर प्रतिक्रिया दिली असून मृताच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचे म्हटले आहे. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

अपघातातील जखमी प्रवाशांची नावे : 

गजानन पांडुरंग हपके (33) अकोला, प्रमीलाबाई गुलाबराव बडगुजर(65) जळगाव, रघुनाथ बळीराम पाटील (70) जळगाव, बाळू पाटील (48) जळगाव, लक्ष्मीबाई गव्हाणे(40) कळवण, संजय बळीराम भोई(60)जळगाव, सुशिलाबाई सोनु बडगुजर(27)जळगाव, वस्सलाबाई पाटील(65)जळगाव, अलकाबाई सुर्यवंशी(75)निफाड, सुशिलाबाई बबन (65)रा. मुंडी, यमुना रामदास गांगुर्डे(40)कळवण, विमलाबाई भोई(59)मुंडी, प्रतिभा भोई(45)मुंडी, जिजाबाई पाटील(65)मुंडी, ज्योती पाटील(29) शिरपूर, संगिता भोई(56)मुंडी, रत्नाबाई मुंडी, मुंशी दंगु खाटीक(68)कळवण, सुरेखा बाई बडगुजर (53)मुंडी, संगिता बाबुलाल भोई(60) मुंडी .

हेही वाचा : 

 

Back to top button