नंदुरबार – खा. डॉ. हिना विजयकुमार गावीत आणि आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सुमारे ७७७ गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना सन २०२१-२२ व २०२२- २३ या आर्थिक ग्राम विकास आराखड्यांच्या निधीस मंजुरी प्राप्त झाली आहे.
या ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लक्ष ६७ हजार रु. एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून ही माहिती देण्यात आली असून त्यात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नवापुर तालुक्यातील गावांना या विकास निधीचा लाभ होणार आहे.
सदर योजने अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ८९ गावे, शहादा तालुक्यातील १११ गावे, नवापुर तालुक्यातील १४५ गावे, तळोदा तालुक्यातील ४२ गावे, अक्कलकुवा तालुक्यतील १४२ गावे, अक्राणी तालुक्यातील ११९ गावे अशी एकुण ६७८ गावे व धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील ६० गावे साक्री तालुक्यातील ३९ गावे अशी एकुण ९९ गावे अशी एकुण ६७८ + ९९ = ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लक्ष ६७ हजार रु. एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीव्दारे या गावांमध्ये गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक, बंदिस्त गटार, बसस्टँड, अंगणवाड्या, महिला व पुरुष शौचालय, सार्वजनिक मुतारी, पाण्याची टाकी बांधणे व नळ जोडणी करणे, जिल्हा परिषद वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह रस्ते व पुलांचे बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, आरोग्य उपकेंद्र बांधकाम, संरक्षण भिंत, ग्रंथालय, व्यायामशाळा, आर.ओ. वॉटर फिल्टर, सोलर ड्युअल पंप, सोलर लाईट, हँडपंप, अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.
हेही वाचा :