सोलापूर : ‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांनी बनविली सर्व्हेलन्स रोबोट कार | पुढारी

सोलापूर : ‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांनी बनविली सर्व्हेलन्स रोबोट कार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी सर्व्हेलन्स रोबोट कार बनवली. या प्रकल्पाची प्रमुख प्रेरणा मानवी जीवन वाचविणे आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमारेषा आणि शत्रूच्या प्रदेशावर पाळत ठेवणे आवश्यक असते. या बदलावर सतत लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील क्षेत्राजवळ कर्मचारी तैनात करून पाळत ठेवली जाते.

मानवाला त्यांच्या मर्यादा आहेत तसेच दुर्गम ठिकाणी तैनात करणे नेहमीच शक्य नसते. विद्यार्थ्यांनी एक रोबोट विकसित केला आहे. जो व्हिडीओ देखरेखीसाठी वापरला जाऊ शकतो. पाळत ठेवणारी रोबोट कार ही सेन्सर, कॅमेरा, सुसज्ज असलेले प्रगत मोबाईल प्लॅटफॉर्म आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि पर्यावरण संशोधनात योगदान देते. पाळत ठेवणारी रोबोट कार ही विविध पाळत ठेवणे व देखरेखीच्या कामासाठी एक बहुमुखी आणि कार्यक्षम उपाय दर्शविते.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी यश सोनी, सिद्धाराम घुगरे, अलकमर शब्बीर लोखंडवाला यांनी परिश्रम घेतले. उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे यांनी अभिनंदन केले.

Back to top button