Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक | पुढारी

Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

त्र्यंबकेश्वर जि. नाशिक : येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंदवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. बुधवारी (दि.5) त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तलाठी संतोष शशिकांत जोशी (वय 47) आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव (वय 51, दोघे रा. त्र्यंबकेश्वर) यांनी तक्रारदाराकडे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने पडताळणी केल्यानंतर तलाठी कार्यालयात दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्याने तेथे सापळा लावून थांबून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष दोघांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

हेही वाचा : 

Back to top button