नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, चार ठार | पुढारी

नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, चार ठार

वणी, पुढारी वृत्तसेवा : वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रृजर यांच्या समोरा समोर धडक झाल्याने मारुती सियाज या कार मधील चौघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात विनायक गोविंद क्षिरसागर (वय ३७), योगेश दिलीप वाघ (१८), जतिन अनिल पावडे (२३ रा मोठा कोळीवाडा,वणी) हे सियाज कार नं.एम एच ४१ व्ही ७७८७ ने सापुता-याकडून वणीच्या दिशेने येत होते. यावेळी समोरुन येत असलेल्या क्रुजर गाडी आणि सियाजमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

समोरासमोर गाड्या धडकल्याने मोठा आवाज झाला आजुबाजुचे लोक धावले. जखमींना बाहेर काढले यात विनायक क्षिरसागर हा कार मध्येच अडकून राहीला होता. अपघाताची माहिती कळताच वणी पोलीस वणीतील काही लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

यातील १०जण गंभीर जखमीना नाशिक येथे हलविण्यात आले आले.यात जतिन अनिल फावडे. २३याला उपचारा साठी नाशिक पाठवले होते.जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. रविंद्र मोतीचंद चव्हाण(वय २२) हा गंभीर झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यात क्युजर गाडीतील ९ जण जखमी झाले आहेत. क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे (४०), कल्पना सुभाष सोळसे ( १९), तुळशीराम गोविंदा भोये (२८), ललीता युवराज कडाळे (३०), रोहिदास पांडुरंग कडाळे (२५), योगेश मधुकर सोळसे (१५), सुभाष काशिनाथ सोळसे (१५), देवेंद्र सुभाष सोळसे (४७), नेहल सुभाष सोळसे वय ७ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button