Nashik Crime : कुंभारवाडा येथे युवकांवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक | पुढारी

Nashik Crime : कुंभारवाडा येथे युवकांवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक येथील कुंभारवाडी परिसरात चौघांनी मिळून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कल्पेश उर्फ सोन्या मनोज झगडे (२२, रा. कुंभारवाडा) हा जखमी झाला आहे. उद्देश मुन्ना कासार (२१, रा. कुंभारवाडी) याच्या फिर्यादीनुसार, चौघांनी मिळून मंगळवारी (दि.२७) कुरापत काढून उद्देश आणि कल्पेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आदित्य जाधव व लखन पवार या दोघा संशयितांना अटक केली आहे. संशयित स्वयंम गोसावी व आमले नामक दोघे फरार असून सहायक पोलिस निरीक्षक सी. पी. सपकाळे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button