नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, रिमेनिंग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाच्या अभ्याक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवार (दि. 27) पासून प्रारंभ होत आहे. येत्या गुरुवारी (दि.२९) बकरी ईदची सार्वजनिक सुटी असल्याने वेळापत्रकानुसार त्या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा 30 जून रोजी घेण्यात येतील, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.
राज्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील 171 परीक्षा केंद्रांवर या परीक्षांना प्रारंभ होत आहे. तसेच 9 ऑगस्टपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग, बेसिक बीएस्सी नर्सिंग, बीपीटीएच, बीओटीएच, बीपीओ, बीएएसएलपी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एमडीएस, डिप्लोमा डेन्टेस्ट्री, एमडी/एमएस, आयुर्वेदा आणि युनानी, एमडी होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एमओटीएच, एमएएसएलपी, एमएस्सी, एमपीओ व बीपीएमटी, एमपीएच, एमबीए, एमफिल, बी ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्थाल्मिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पीजी डीएमएलटी, सीसीएमपी, एमएमएसपीसी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अडचणी किंवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विद्यापीठाचे अधिकृत www.muhs.ac.in संकेतस्थळावर (Website) परीक्षेसंदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.