नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून करणारा दोन वर्षांनंतर गजाआड

नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून करणारा दोन वर्षांनंतर गजाआड
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपघाती विम्याची रक्कम घेण्यासाठी अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. उदय रामेश्वर वाघमारे (२०, रा. वैष्णव रोड, पंचवटी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितांनी कट रचून अशोक सुरेश भालेराव (४६, रा. भगूर रोड) यांचा दि. २ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ खून करून अपघाताचा बनाव रचला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भालेराव यांनी स्वत:च्या नावे साडेचार कोटींचा विमा काढला होता. त्यानंतर स्वत:च्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह दाखवून विम्याचे पैसे लाटण्याचा डाव भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी रचला होता. मात्र त्यांचा हा बेत फसल्याने भालेरावच्या सहकाऱ्यांनी अशोक भालेराव यांचाच खून करून अपघाताचा बनाव रचण्याचा कट आखला. त्यानुसार संशयितांनी सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईहून आलेल्या भालेराव यांचा जॉगिंग ट्रॅकजवळ टणक हत्याराने डोक्यात मारून खून केला. त्यानंतर अपघातात भालेराव यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. सुरुवातीला मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिसेंबर २०२२ मध्ये विम्यातील आलेल्या पैशांच्या वाटणीवरून नाराज झालेल्या संशयितांच्या टोळीतील महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर भालेराव यांच्या खुनाचा उलगडा झाला. त्यानुसार पोलिसांनी तपास करून रजनी कृष्णदत्त उके, मंगेश बाबूराव सावकार, दीपक अशोक भारूडकर, किरण देवीदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ व प्रणव राजेंद्र साळवे (सर्व रा. नाशिक) यांना अटक केली होती, तर संशयित उदय वाघमारे फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखेतील अंमलदार विशाल देवरे यांना वाघमारेची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, अंमलदार प्रवीण वाघमारे, नाझीम पठाण, देवरे, विशाल काठे, आप्पा पानवळ, महेश साळुंके, राजेश राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

खुनात सक्रिय सहभाग

पोलिसांच्या चौकशीत भालेराव यांचा खून करण्यात वाघमारेचा सक्रिय सहभाग असल्याचे आढळले. भालेराव यांना मारहाण करण्यात मंगेश सावकारसह उदय सोबत होता. पोलिसांनी ज्यावेळी संशयितांची धरपकड केली त्यावेळी उदय मुंबईला असल्याने तो तेथून फरार झाला. त्यानंतर तो गुजरात व मध्य प्रदेशात वास्तव्यास होता. तेथून तो नाशिकला आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news