Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात | पुढारी

Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम झाल्याची बाब अधोरेखित होत आहे. नाशिकमधील दोन मोठ्या कारवायांनंतर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी (दि.६) ही कारवाई झाली.

तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस शिपाई करण गंभीर थोरात (३२) यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक साधना बेलगावकर यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा :

Back to top button