धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या | पुढारी

धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

न्यायालयाच्या आदेशाने महिलेच्या जन्माची नोंद करण्यासाठी विलंब शुल्काच्या नावाखाली चौदाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.

शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथे राहणाऱ्या तक्रारदाराच्या आत्याचा जन्म एक मे 1968 रोजी मौजे जामण्यापाडा येथे झाला होता. या महिलेचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. या जन्मनोंदीसाठी तक्ररादाराने शिरपूरच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रारदार यांची नातेवाईक असणाऱ्या महिलेची जन्माची नोंद दप्तरी घेण्यासाठी 14 डिसेंबर 2022 रोजी आदेश दिले आहेत. तक्रारदाराने जामण्यापाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जन्मनोंदीसाठी अर्ज केला होता. ग्रामसेवक चौधरी यांनी जन्मनोंदीसाठी विलंब शुल्क लागेल, असे सांगून चौदाशे रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वीकारताना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने सापळा रचत पकडले आणि अटक केली.

हेही वाचा :

Back to top button