जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी (दि.१) तापमानाचा पार ४३ अंशांपर्यंत गेल्याने उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे.
जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला होता. ४५ ते ४६ अंशांवर जाणारा पारा आता ४१ ते ४२ अंशांवर आला होता. त्यामुळे दिवसातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली होती. तसेच रात्रीच्या वेळेस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात थंडावा जाणवत आहे. जिल्ह्यात मात्र, दोन दिवसांपासून पारा पुन्हा वाढू लागला आहे. आता त्यात वाढ होऊन तो पुन्हा ४३ अंशांवर गेला आहे. दोन दिवसांत दोन अंशांनी तापमान वाढले आहे. उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना पुन्हा एकदा हैराण केले आहे. सकाळी १० पासून उन्हाच्या झळा बसत आहेत. सायं. ४ पासून ते ६ पर्यंत उष्णतेच्या झळा अधिक तीव्र असतात. त्यात काळजी घेतली नाही, तर मात्र उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :