

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात कांद्याचा प्रश्न वाढत चालला आहे. कांद्याला भाव मिळत नाही. सरकार त्यासाठी काहीही करत नाही. आता मात्र आपण कसलीही चिंता करण्याची गरज नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आले आहेत. त्यांनी एक कॉल केला की, लगेच हा प्रश्न सुटू शकतो, अशी उपहासात्मक टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, महाविकास आघाडीमध्ये बाहेर कीर्तन, आतमध्ये तमाशा असे नाही. तुमचा तमाशा आटोक्यात ठेवा. दोन पक्षांत मतभेद होतात. तर तीन पक्षांत होणारच, असे सांगत एका पक्षातही तिकिटासाठी वाद होत असल्याचे भुजवळ म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाच्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे.
पण यावर होणाऱ्या अपघातांबाबत अद्याप काहीही उपाययोजना नाही, हा मार्ग जोवर मुंबईशी कनेक्ट होत नाही तोवर खरा फायदा नाही, रहदारी वाढणार नाही. ट्रॅफिकपासून सुटका होईल, बाकी आनंदच आहे. तर पीएमआरडीए मेट्रो भरतीसंदर्भात भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची भरती बिहारला होत असून, महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एक फोन केला तरी काम होईल. आंदोलनाची वाट कशाला पाहता. त्याऐवजी राज्यातील भरती राज्यातच करा, असा सल्ला भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.
हेही वाचा :