Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित | पुढारी

Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित

जळगाव : आपण आजवर २१ किंवा २२ बोटे असलेली मुले पाहिली असतील. मात्र यावल तालुक्यात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने जन्म दिला आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच मानला जात असून, या दुर्मिळ घटनेमुळे डॉक्टरांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

मध्य प्रदेशातील झिरन्या जि. खरगोन येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला (वय २०) या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने मध्यरात्री यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर व संपूर्ण स्टापने परिश्रम घेऊन तिची सुरक्षित प्रसूती केली. २६ बोटे असलेल्या या बालकास पाहून सर्वच अवाक झाले.

या नवजात बाळाच्या दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. ही वैद्यकीय इतिहासातील  दुर्मिळ घटना असल्याचे अनेक डॉक्टरांचे मत आहे. या बाळाच्या जन्माची माहिती गावात पसरताच या बालकाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. सद्यस्थितीत माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले, परिचारिका कोमल आदिवाले, सुमित बारसे, सरला परदेशी, पौर्णिमा कोळंबे, अरुण पाटील यांनी या महिलेच्या सुखरुप प्रसूतीसाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button