जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू | पुढारी

जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात तापमानाचा पारा अजूनही वाढलेलाच आहे. वाढत्या तापमानानुळे जळगाव तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (४५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच  शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. अशावेळी वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः शेतात मका काढण्याचे काम सुरु केले. शुक्रवारी (दि.19) दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना उष्माघातामुळे उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात  उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर पाटील यांच्याकडे वावडदा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन पद देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे.

हेही वाचा:

Back to top button