राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

राज ठाकरे
राज ठाकरे

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवार (दि. १९) पासून नाशिक दौरा आयाेजित केला आहे. राज ठाकरे हे गुरुवार (दि. १८) पासून नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांनी दौऱ्यात बदल केला आहे. ते शुक्रवार (दि. १९) ते साेमवार (दि. २२) शहरात संघटनानिहाय बैठका घेणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढवण्यासोबतच नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील पक्षाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news