सांगली : शिराळा येथे अल्पवयीन मुलीसोबत विवाह; विवाह जुळवणार्‍यासह 8 जणांवर गुन्हा | पुढारी

सांगली : शिराळा येथे अल्पवयीन मुलीसोबत विवाह; विवाह जुळवणार्‍यासह 8 जणांवर गुन्हा

शिराळा : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राजेद्र शंकर शेवाळे (वय 31, रा. येवती-शेवाळवाडी, ता. कराड, जि. सातारा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 22 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हा विवाह 29 एप्रिल रोजी शिराळा येथे झाला होता. याबाबत कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवाह लावणार्‍यासह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राजेंद्र शेवाळे तसेच संगनमताने बालविवाह लावल्याबद्दल मुलीच्या वडिलांसह आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिराळा येथे झाल्याने शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे कर्नाटक राज्यातील एक कुटुंब व्यवसायासाठी राहत होते. यातील एका अल्पवयीन मुलीशी राजेंद्र शेवाळे याचा विवाह करण्यात आला. हा विवाह जुळवण्यासाठी इस्लामपूर येथील ताई मोरे नामक महिलेने पुढाकार घेतला होता. या ताई सोबत राजेंद्र शेवाळे, व त्याचे मामा तातोबा वासु पाटील, मामी त्याचे चुलते बापुराव शेवाळे, चुलती यांनी मुलीच्या घरी येऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला.

त्यानंतर शिराळा येथील बबन बाळकृष्ण शेवाळे यांच्या पाहुण्याचे घरी विवाह लावण्यात आला. यानंतर लग्नाच्या मध्यस्थी ताई हिने तिने फिर्यादीला शितुर (ता. शाहूवाडी) येथे मुलाचे चुलता बापुराव शेवाळे याच्या घरामध्ये बोलावुन घेऊन मुलीच्या वडिलांना व ताई या दोघांना 25 – 25 हजार रुपये दिले होते.

फिर्यादीने आपली मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना सुध्दा फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिची फसवणुक करुन अल्पवयीन मुलीचा बालविवाह करुन तिच्याशी वेळोवेळी तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले बाबत संशयित आरोपी राजेंद्र शेवाळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. चुलता बाबुराव आनंदा शेवाळे , चुलती संगीता बाबुराव शेवाळे ( सर्व रा. येवती) , मामा तातोबा वासू पाटील , मामी ( रा.शित्तुर) , मध्यस्थी ताई मोरे ( रा. इस्लामपूर ) , लग्न लावणारा भटजी , फिर्यादीचा पती ( रा. आष्टा) , बबन कृष्णा शेवाळे ( रा. शिराळा) या आठ जणांविरुद्ध आपापसांत संगणमत करून फिर्यादी व फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीच्या वाडीलास पैसे देवुन तिचा बालविवाह लावून दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button