चामगावात गाईवर बिबट्याचा हल्ला, दाेन महिन्‍यांतील सहावी घटना | पुढारी

चामगावात गाईवर बिबट्याचा हल्ला, दाेन महिन्‍यांतील सहावी घटना

जळगाव (नाशिक) ; पुढारी वृत्‍तसेवा

धरणगाव तालुक्यातील चांमगाव येथे आज (दि. १८) पहाटे बिबट्याने शेतात बांधलेल्या गाईवर हल्ला केला. यामध्ये गाईचा मृत्यू झाला. ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. गेल्या दोन महिन्यात ही पाचवी ते सहावी घटना आहे.

धरणगाव तालुक्यातील चामगाव येथील शेतकरी चद्रभान सुधाकर कोळी  यांच्या शेतात गाय बांधली हाेती. बिबट्याने तिच्‍यावर हल्‍ला केला.  दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बिबट्याने एका गाईवर हल्ला केला होता. गेल्या दोन महिन्यातील सहावी घटना आहे.

बिबट्याकडून पाळीव जनावरांवर वारंवार होणाऱ्या हल्‍ल्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्‍थांमधून होत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button