जळगाव : गावठी कट्टा व चॉपरने दहशत माजविणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अकलुद येथे दहशद माजवीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, चॉपर जप्त करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून गावठी कट्ट्याने दहशत माजवणारे आरोपींचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आदेश दिले होते.अशा आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 16 रोजी अकलुद गावी हॉटेल राजेमोर सार्वजनिक ठिकाणी दोन इसमांकडे गैरकायदा गावठी कट्टा आणि चॉपर आहे. हे दोघे परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स. फौ. अशोक महाजन, पो. हे. कॉ. लक्षमण पाटील, पो. ना श्रीकृष्ण देशमुख, पो. ना. रणजित जाधव, पो. ना किशोर राठोड, पो. कॉ विनोद पाटील, पो. कॉ ईश्वर पाटील त्या ठिकाणी जाऊन आरोपी सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी (वय-19 रा.तापी नगर भुसावळ), धीरज केशरसिंग जाधव (वय-26 रा. मोरेश्वरनगर भुसावळ) यांना ताब्यात घेतले.
यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता कमरेला खोचलेला 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि 500 रुपयांचा चॉपर मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील योग्य त्या कारवाईसाठी त्या आरोपींतास फैजपुर पोस्टेच्या ताब्यात दिले आहे.
- रितेश देशमुख ने आईला ओवाळले, फॅन्स म्हणाले मुलगा असावा तर असा
- Ranveer Singh : ये पैदा ही अलग प्लॅनेट में हूवा हैं…
- नऱ्हे : दारुसाठी आईने दिले नाहीत पैसे; मुलाने केला खून