नाशिक : सातपूरला भीम फेस्टिवलची सांगता | पुढारी

नाशिक : सातपूरला भीम फेस्टिवलची सांगता

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक इंडियन आयडल फेम संतोष जोंधळे यांच्या एक से बढकर एक भीमगीतांनी सातपूरकर मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलचे.

भीम फेस्टिवल स्वागत समिती व जेतवन बुद्ध विहार यांच्या वतीने सातपूर कॉलनी येथील जिजामाता मैदानावर भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या पुतंळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भीम फेस्टिवलच्या अध्यक्षा कमल महिरे, कार्याध्यक्षा रिता जगताप यांनी स्वागत केले. स्थायीचे माजी सभापती सलीम शेख, माजी नगरसेवक योगेश शेवरे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, संकल्पित रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश पगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, धीरज शेळके, गीता जाधव, योगेश गांगुर्डे, आदेश पगारे, शिवाजी काळे, संदेश पगारे, जेतवन बुद्ध विहाराचे सदस्य विजय अहिरे, प्रणील धनधार या मान्यवरांना संविधान प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिपिन कटारे, प्रशांत जगताप, वैभव महिरे, प्रतीक पगारे, दीपक निळे, प्रशांत धिवरे, भारत भालेराव, राहुल गायकवाड, कुंदन पगारे, सतीश केदारे, कुंदन जगताप, योगेश पानपाटील, अजिंक्य जाधव, निशांत शेट्टी, मंगेश जगताप, अरुण पाटील, अविनाश गायकवाड, उमेश जगताप, बंटी लभडे, प्रफुल्ल कटारे, अतुल गोरे, विकी संसारे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Back to top button