Nashik Crime : बेकायदा शस्त्र बाळगणारे सहा तरुण गजाआड | पुढारी

Nashik Crime : बेकायदा शस्त्र बाळगणारे सहा तरुण गजाआड

नाशिक : बेकायदा धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी सहा जणांना शहर पोलिसांनी पकडले आहे. सोमवारी रात्री ते मंगळवार सायंकाळदरम्यान, पोलिसांनी ही कारवाई केली. यात संशयितांकडून हत्यारे व दुचाकी जप्त केली आहे.

पंचवटी पोलिसांनी कुमावतनगर येथील हमालवाडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संशयित योगेश दत्तू क्षीरसागर (३४, रा. कुमावतनगर) यास पकडले. त्याच्याकडे कोयता आढळला. त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सातपूर पोलिसांनी राहिल नुरुद्दीन सैयद (१९, रा. शिवाजीनगर, सातपूर) यास कार्बन नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडेही पोलिसांना कोयता आढळून आला. या प्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड पोलिसांनी सामनगाव रोडवरून निकेश अशोक जाधव (३३) आणि आतिश शांताराम चौधरी (१९) यांना पकडले. त्यांच्याकडे पोलिसांना दोन तलवारी आढळल्या. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

दरोडा विरोधी पथकाने जयभवानी रोडवर कारवाई करीत संशयित गोविंदा संजय साबळे (२२, रा. नाशिकरोड) व निरन ऊर्फ नऱ्या ऊर्फ नरेश नागू नरोटे (२०, रा. अरिंगळे मळा) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोयते व दुचाकी असा ६० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button