[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकांनी गेल्या दहा दिवसांपासून पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात तळ ठोकला आहे. वनविभागाने सापगाव, धुमोडी, शिरगाव परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे तैनात पिंजऱ्यांची संख्या १९ वर जाऊन पाेहोचली आहे. पिंजऱ्याऐवजी खुल्या ठिकाणी सावज ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
पिंपळदमध्ये ६ एप्रिलला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात प्रगती ऊर्फ देविका भाऊसाहेब सकाळे (वय ७) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिबट्या कैद करण्यासाठी पिंपळद परिसरात पिंजरे तैनात असून, पंचवीस ट्रॅप कॅमेऱ्यांच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. घटनास्थळी ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल काहीअंशी चित्रित झाली. तीनदा ड्रोनमध्ये आढळून आला असून, त्याचे वय निश्चित करण्यात वनाधिकाऱ्यांना अडचणी येत आहे.
दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यावर वनविभागाने भर दिला आहे. बिबट्या मानवी वस्तीजवळच घिरट्या घालत असून, दोन कुत्र्यांचीही बिबट्याने शिकार केली आहे. बिबट्या दूरचा प्रवास करून याठिकाणी आला असावा. तसेच आपले क्षेत्र निश्चित करण्याच्या प्रयत्नात बिबट्या गोंधळला असल्याची शक्यता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वर्तविली जाते आहे.
तांत्रिक समितीचे शुटआउटवर शिक्कामोर्तब?
ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये एकच बिबट आढळून आला. मात्र, त्याला पकडण्यात वनविभागाला अपयश येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बिबट्याला ठार करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक समिती गठित करण्यात आल्याची चर्चा आहे. समितीने बिबट्याच्या शुटआउटवर शिक्कामोर्तब करून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केल्याचे समजते.
नाईकवाडी येथे बिबट्या जेरबंद
पिंपळदची घटना ताजी असतानाच नाशिक तालुक्यातील नाईकवाडी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार रतन दामू थेटे यांच्या मालकी गट क्रमांक 69 मध्ये शुक्रवारी (दि. 14 ) पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी (दि.१६) पहाटे चारच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पिंजऱ्यासह वनपथकाने सुरक्षित स्थळी हलविले.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
हेही वाचा :