नाशिक : अवकाळीचा सटाणा तालुक्याला मोठा फटका; मुख्यमंत्र्याचा आज पाहणी दौरा | पुढारी

नाशिक : अवकाळीचा सटाणा तालुक्याला मोठा फटका; मुख्यमंत्र्याचा आज पाहणी दौरा

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

सटाणा तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. अवकाळी व गारपिटीने सटाणा येथे दोन दिवसात 4500 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येत असून दुपारी 1.15 वाजता सटाण्यात नुकसानीची ते पाहाणी करणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री यांचा अचानक दौरा लागल्याने यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सटाण्यात गारपीटही झाली असून काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बहुतांशी ठिकाणी कांदा पावसात भिजला असून त्यामुळे त्याची टिकवण क्षमता संपणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अन्य शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

याव्यतिरिक्त घरांवर झाडे पडल्याने तसेच घर, छत, कांदा चाळीचे पत्रे उडाल्यानेही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यासर्व परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button