जळोची : वाढीव वीजदरामुळेे ‘सूत उद्योग’ धोक्यात | पुढारी

जळोची : वाढीव वीजदरामुळेे ‘सूत उद्योग’ धोक्यात

जळोची : पुढारी वृत्तसेवा : 1 एप्रिलपासून झालेल्या वीज दरवाढीने पश्चिम महाराष्ट्रतील ‘सूत उद्योग’ धोक्यात येणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सूत उद्योगासाठी जास्त वीज दरवाढ आकारली जाते; परंतु मागास भाग व कापूस उत्पादक म्हणून विदर्भ व मराठवाडा येथील सूत उद्योगास वीजदरांमध्ये महावितरण विशेष सवलत देते. पश्चिम महाराष्ट्रातील सूत उद्योगास कोणत्याही सवलती नाहीत.
मार्च 2022 ते मार्च 2023 विजेचे प्रतियुनिट दर

(सर्व आकार धरून-रुपयात) : महाराष्ट्र : 10.85, कर्नाटक : 8.60, गुजरात : 6.58, मध्य प्रदेश : 8.89, छत्तीसगड : 7.91, तेलंगणा : 8.81, आंध— प्रदेश : 7.51.

वीज दरवाढ रद्द करावी
बारामती तालुक्यातील एकमेव सूत उद्योग म्हणजे ‘जीटीएन इंजिनिअरिंग’. बारामती एमआयडीसीची स्थापना झाल्यापासून सोमा व त्यानंतर जीटीएन नावाने ही कंपनी अस्तित्वात आहे; परंतु आर्थिक संकट नव्हते. कोरोना महामारीमध्ये कंपनी टिकली; परंतु सर्व क्षेत्रांतील वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा पगार व आता वाढते वीज दर यामुळे कंपनी चालविणे कठीण झाले आहे. एप्रिलपासून झालेली नवीन वीज दरवाढ रद्द करावी, अशी मागणी जीटीएनचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव मिश्रा यांनी केली आहे.

Back to top button