Maharashtra covid case : महाराष्ट्रात २४ तासात ९२६ नवीन कोविड रूग्णांची नोंद; तिघांचा मृत्यू

Maharashtra covid case : महाराष्ट्रात २४ तासात ९२६ नवीन कोविड रूग्णांची नोंद; तिघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra covid case )दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 926 नवीन कोविड रूग्णांची नोंद करण्यात आली. तर 3 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. राजधानी मुंबईत 276 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी 803 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले. तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी आज शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जिनोम सिक्वेन्सिंगसह कोविड नियमांबाबत जागृती वाढविण्याबाबत चर्चा झाली. आपण सतर्क राहिले पाहिजे आणि कोरोनाबाबत कोणतीही अनावश्यक भीती पसरवण्याचे टाळले पाहिजे, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. १० आणि ११ एप्रिल रोजी कोविड संदर्भात संपूर्ण देशात मॉक ड्रिल होईल. ज्यात सर्व आरोग्यमंत्र्यांनीदेखील हॉस्पिटलला भेट द्यावी, असे सांगण्यात आल्याचे मांडविया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

केंद्राने कोविड १९ संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमितपणे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांतील स्थितीचा आढावा घेतला असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ६,०५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या २८,३०३ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ०.०६ टक्के एवढे आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ३,३२० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३.३९ टक्क्यांवर गेला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.०२ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news