नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे | पुढारी

नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक दौर्‍यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत डॉ. डी. एल. कराड यांनी चर्चा करत, यात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. कराड यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यची आपल्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी, सरकारचे कामगारविषयक धोरण, कामगारांचे सध्या निर्माण झालेले प्रश्न, असंघटित कामगारांच्या समस्या यांबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात कामगारविषयक त्रिपक्षीय समित्या अजूनही स्थापन केलेल्या नाहीत, या त्रिपक्षीय समित्या व कामगारविषयक मंडळावर राष्ट्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. यंत्रमाग कामगार, रिक्षाचालक, हॉकर्स व अन्य असंघटित 122 क्षेत्रांतील कामगारांना कुठलीही सामाजिक सुरक्षा लागू नाही. त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळे स्थापन करावीत. तसेच स्वतंत्र सेसद्वारे निधी जमा करावा व त्यामार्फत सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना लागू कराव्यात आदी मागण्या मांडल्या.

हेही वाचा:

Back to top button