पुणे : विमानतळावर आजपासून डीजी यात्रा सेवा | पुढारी

पुणे : विमानतळावर आजपासून डीजी यात्रा सेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अ‍ॅपवर आधारित ‘डीजी यात्रा’ ही सेवा पुणे विमानतळावर आज (दि.31)पासून सुरू करण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर या सेवेला हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे पुणे विमानतळावर प्रवाशांना आता सुरक्षा तपासणीसाठी (चेकइन) जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही. प्रवाशांचा चेहराच आता बोर्डींग पास असणार आहे.

अशी झाली सेवा सुरू…
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ‘डीजी यात्रा’ योजना राबविली जाते. पहिल्या टप्प्यात दिल्ली, बंगळुरू, वाराणसी येथे सुरू असलेली डीजी यात्रा सुरू केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पुणे विमानतळावर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. आता तिचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पाहणी केली आहे. त्यानुसार आजपासून प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता घेणार आहे.

असा करता येईल सेवेचा वापर…

प्रवाशाला डीजी यात्रा हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.

त्यानंतर आधार क्रमांक लिंक करून त्याचे सर्व तपशील अ‍ॅपवर नोंदवावे.
त्यानंतर स्वत:चा सेल्फी अपलोड करावा लागेल.
अ‍ॅप वापरादरम्यान, प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.
डीजी यात्रा अ‍ॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशाला चेक-इनसाठी जास्त वेळ लागणार नाही.

विमानतळावर प्रवाशांचा चेहरा स्कॅन करावा लागेल.

त्यानंतर यंत्रणेत संबंधित प्रवाशांची विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याची नोंद होईल.

त्यानंतर ‘सिक्युरिटी चेक-इन’ करताना सीआयएसएफचे जवान संबंधित प्रवाशाचे स्कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील.

नंतर प्रवाशांना आत प्रवेश मिळेल.

Back to top button