नाशिक : सहायक निंबधकास लिपिकासह लाच घेताना अटक | पुढारी

नाशिक : सहायक निंबधकास लिपिकासह लाच घेताना अटक

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तालुका सहायक निबंधकांनी वीस लाख रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक निबंधक रणजीत पाटील असे लाच घेतलेल्या संशयितचे नाव आहे. पाटील यांच्यासोबत वरिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात खाजगी सावकारी प्रकरणे उघडकीस आले आहेत. यामुळे खासगी सावकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरात खाजगी सावकारीच्या त्रासाला वैतागून कुटुंबातील सदस्यांनी जीवन संपवले आहे. या प्रकरणानंतर शहरांमध्ये खाजगी सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत कारवाई सुरु आहे. दरम्यान, तक्रार अर्ज वरून सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची रक्कम घेताना अजित पाटील यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन विरणारायन यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा;

Back to top button