

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांनीही विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. माध्यमात उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार असे बोलले जात असले तरी ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा विखारी टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना तुटलेली नाही, झुकलेली नाही हा संदेश देण्यासाठी ही सभा होतेय, असे सांगत त्यांनी 'चिते की चाल..' या डायलॉगच्या तालावर उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर संदेह करत नाही, असे वक्तव्य करत सभेत जोश भरला. मालेगाव के शोले भडकले आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचे तुफान आता कुणी रोखू शकणार नाही. तेव्हा शिवसेनेचे नाव, चिन्ह काढून घेतलेल्या निवडणूक आयोगाने हे चित्र पाहून ठरवावे, असे आव्हान दिले.
नीम का पत्ता कडवा है.. या ओळीनंतर सभेतून साद घेत, खा. राऊत यांनी कांदा रस्त्यावर टाकावा लागत असला, तरी आपल्याला सुहास कांदे, गुलाबरावला फेकायचे आहे. त्यांना त्याच खोक्याखाली चिरडू असे आवाहन केले. कठीण काळात डॉ. हिरे यांनी शिवसेनेचा हात पकडला. कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार यांनी खांद्याला खांदा लावून लढा दिला आता त्यांचे वारसदार लढतील, यातून आपले राज्य येईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :