Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने | पुढारी

Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी येवल्याचा परिसर दणाणून सोडला. येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधारी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर प्रवक्ते नानासाहेब शिंदे, डाॅक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, पर्यावरण विभाग तालुकाध्यक्ष दयानंद बेंडके, राजेंद्र गणोरे, ऋषिकेश गायकवाड, नंदकुमार शिंदे, ॲड. अनिल झाल्टे, अशोक नागपुरे, संजय गोंधळी, राजवीर शिंदे, वसुधंरा शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button