शुक्र-चंद्राच्या युतीचे पिंपरी- चिंचवडवासीयांना दर्शन | पुढारी

शुक्र-चंद्राच्या युतीचे पिंपरी- चिंचवडवासीयांना दर्शन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : खगोलप्रेमींसाठी शुक्र-चंद्राच्या पिधान युतीचे विलोभनीय दृष्य बघण्याची संधी पिंपरी- चिंचवडवासीयांनी शुक्रवार (दि.24) दुपारी साडेचारच्या सुमारास मिळाली. सद्यस्थितीत आकाशात सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह आहे. शुक्रवारी पृथ्वी, चंद्र व शुक्र एका रेषेत येत असल्याने सुमारे दीड तास हा ग्रह दुपारी 4.17 ते सायंकाळी 5.51 या वेळात पिधान अवस्थेत असताना शुक्र ग्रह चंद्रबिंबाआड झाकला गेला. संधी प्रकाशामुळे हे दृध्य स्पष्टपणे दिसू शकले नाही.

साधारण 4.17 पासून चंद्राची गती अधिक असल्यामुळे साधारण साडेचार वाजता चंद्र व शुक्र एका रेषेत आले. यांचे दर्शन हे खगोलप्रेमीं नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरले. शुक्र ग्रह अत्यंत तेजस्वी असून, त्याची दृष्यप्रत उणे चार आहे. या ग्रहाचे स्थान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असल्याने याचा उदय वा अस्त पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर होतो. या ढगांमुळे सूर्य प्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित होऊन हा ग्रह ठराविक वेळी भरदिवसा साध्या डोळ्यांनी पाहता येतो. अंतर्ग्रह असल्याने याच्या कलांचे दर्शन दुर्बिणीतून खगोलप्रेमी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना घेता आले.

संधिप्रकाशात चंद्र-शुक्राचे दर्शन
ही एक प्रकारची ग्रहण स्थिती असते. मात्र, ही खगोलीय घटना आकाशात संधिप्रकाश असताना पाहता आली. या काळात चंद्रकोरीजवळच शुक्र ग्रह दिसला. या अनोख्या घटनेचे साक्षीदार आज पिंपरी चिंचवड येथील असंख्य नागरिक आणि विद्यार्थी झाले.

चंद्र हा वेगवान ग्रह आहे. चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारण सत्तावीस दिवस लागतात. आजपासून बरोबर अठ्ठावीसाव्या दिवशी ही युती पुन्हा पाहायला मिळेल. पण आजच्यापेेक्षा याचे दर्शन थोडे कमी वेळ होईल. आकाशात पश्चिमेकडे या योगाचे दर्शन होईल.
                                                   – सुनील पोटे, शिक्षक, सायन्स पार्क

Back to top button