नाशिक : लव्हारदोडी शिवारात शेतात रचून ठेवलेला सोयाबीन जळून खाक | पुढारी

नाशिक : लव्हारदोडी शिवारात शेतात रचून ठेवलेला सोयाबीन जळून खाक

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील हनुमंतपाडा येथील शेतकरी धाकलू झिपा चौरे कोकणी यांच्या मौजे-लव्हारदोडी शिवारातील दीड एकर शेतातील सोयाबीन पिकाची कापणी करून एकत्र रचून ठेवलेल्या ढिगाऱ्याला रात्री १२.२० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे आठ ते दहा पोते सोयाबीन जळून खाक झाला.

दरम्यान गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, लोडशेडिंगमुळे जवळच विहिर असूनही पाण्याचा उपयोग करता आला नाही. सोयाबीन पिकाचे दीड एकरातील सुमारे आठ ते दहा पोते जळून खाक झाले. यात सुमारे ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. सामाजिक कार्यकर्ते टेटू बागुल, ग्रामसेवक आर.के. बहिरम, उपसरपंच छगन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अनिल बागुल, मनीलाल चौरे, साईराम भवरे, शांताराम बागुल, उखा मालचे व ग्रामस्थांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन मदतीची मागणी केली आहे.

शासनामार्फत पंचनामे होतात परंतु नुकसान भरपाई मिळत नाही. या नियमात बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी उपसरपंच छगन देशमुख यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button