पिंपरी : चोर्‍यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर | पुढारी

पिंपरी : चोर्‍यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

पिंपरी : अल्पवयीन मुलांचा चोर्‍यांसाठी वापर करणार्‍या सराईताला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 65 हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली. सुरेश दगडू जगताप (38, रा. कुसगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथक आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना सराईत मोबाईल चोरटा वाकड स्मशानभूमी परिसरात येणार असल्याची माहिती हवालदार कानगुडे, नलगे व गिरिगोसावी यांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून संशयित जगताप याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता चोरीचे आठ मोबाईल मिळून आले. अधिक तपासात त्याने स्वतःचा अल्पवयीन मुलगा आणि भाचा यांचा चोरीसाठी वापर केल्याचे समोर आले. दरवाजावाटे किंवा रात्रीच्या वेळी हे चोरटे लेबर कॅम्पला लक्ष्य करून मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलिस कर्मचारी सुनील कानगुडे, किरण काटकर, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, गणेश गिरिगोसावी, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे या पथकाने कामगिरी केली.

Back to top button