नाशिक : येवला बाजार समिती तीनच दिवस बंद ठेवणार | पुढारी

नाशिक : येवला बाजार समिती तीनच दिवस बंद ठेवणार

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने दि. २५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत समिती बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विरोध करण्यात आल्यानंतर आता बाजार समिती फक्त तीनच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

बाजार समिती ही दि. २५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येऊ नये, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. अजून लाल कांदा भरपूर असल्याने आणि कांदा खराब होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सरकारने जाहीर केलेले अनुदानही त्या कालावधीमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केट कमिटी बंद ठेवण्यात येऊ नये असे प्रशासकांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अमोल फरताळे, हरिभाऊ महाजन, वसंत झांबरे, शंकर गायके, पांडुरंग शेलार, बापूसाहेब शेलार, सचिन पवार, गणेश लोहकरे, जगदीश गायकवाड, सुनील पाचपुते, राहुल बाराहाते, रामभाऊ नाईकवाडे आदी उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली, तर मार्केट कमिटी व सहायक निबंधक यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. होणाऱ्या परिणामास मार्केट कमिटी जबाबदार राहील.

– अमोल फरताळे, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष

हेही वाचा :

Back to top button