नंदुरबार : उद्योजकांना’राष्ट्रीय चर्चासत्रा’तून मिळाल्या मोलाच्या ‘टिप्स’

नंदुरबार : उद्योजकांना’राष्ट्रीय चर्चासत्रा’तून मिळाल्या मोलाच्या ‘टिप्स’

Published on

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : MSME मंत्रालयाचे मुंबई विकास कार्यालय आणि "चेंबर फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिझनेसेस (CASMB) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदुरबार येथे 'एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र' मंगळवारी (दि.१४) पार पडले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकास वाढीसाठी मार्गदर्शन करणे हा होता. शेतमाल व फळभाज्या प्रक्रिया संबंधित छोटे व मध्यम उद्योग करणाऱ्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील २०० हून अधिक जणांनी या चर्चासत्रात उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

नोव्हेंबर २०२२ पर्यंत GeM पोर्टलने १२.२८ दशलक्ष रु.च्या ऑर्डर दिल्या आहेत. ६२,२४७ खरेदीदार संस्थांसाठी ५.४४ दशलक्ष नोंदणीकृत विक्रेते आणि सेवा प्रदात्यांकडून ३३४,९३३ कोटी (US$ ४०.९७ अब्ज). सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या डेटानुसार २५ नोव्हेंबर २०२२ रोजी शेवटचे अद्यतनित केले गेले. उद्यम नोंदणी पोर्टलने १२,२०१,४४८ MSME ची नोंदणी केली.

 १ एप्रिल २०२३ पर्यंत अर्थ मंत्रालयाने सूक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी योजनेसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टमध्ये ९ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. मंत्रालय MSME ला २ लाख कोटी अतिरिक्त संपार्श्विक मुक्त क्रेडिट देखील प्रदान करेल, तर क्रेडिट खर्च १% ने कमी करेल, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.

३२ आदिवासी गावांना कांदा आणि लसणाच्या व्यावसायिक लागवडीचा होतोय फायदा

नंदुरबार जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे. निम्मी लोकसंख्या कृषी व्यवसायात गुंतलेली आहे. नंदुरबार जिल्ह्याचा कृषीविषयक विकास आणि जिल्ह्यातून कुपोषण दूर करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. सरकार लोकांना प्रशिक्षणाभिमुख उपक्रमांसाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात हातभार लागेल. कांदा, लसूण, मिरची ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाची पिके असून बाजरी या पिकांना निर्यात क्षमता असल्याने महत्त्व प्राप्त होत आहे. शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृषी-अन्न विभाग लक्ष देत असतो. आदिवासींच्या अन्न आणि पौष्टिक सुरक्षेतही या विभागाची भुमिका महत्त्वपूर्ण असते.  कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय,राजगुरुनगर (ICAR-DOGR) याद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील 32 आदिवासी गावांना कांदा आणि लसणाच्या व्यावसायिक लागवडीचा फायदा झाला आहे, अशीही माहिती देण्यात आली.

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. लहान असो की मोठा असो उद्योग उभा करण्यासाठी शासनाने भरपूर निधी आणि योजना उपलब्ध केल्या आहेत. परंतु उद्योग करू पाहण्याऱ्यांपर्यंत त्या योजना पोहचत नाहीत. अशी खंत जिल्हाधिकारी खत्री यांनी यावेळी व्यक्त केली आणि योजनांचा लाभ कोणाला कसा घेता येईल? यावर मार्गदर्शन केले.

MSME मंत्रालय मुंबई विकास कार्यालयाचे सहाय्यक संचालक श्री प्रफुल उमरे यांनी योजनांची माहिती देऊन या जिल्ह्यामध्ये उद्योगिकता वाढावी, यासाठी इच्छुकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले व त्यासाठी काय करता येईल, यावर मार्गदर्शन केले. तसेच गजानन डांगे (प्रेसिडेंट, योजक, सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्‍टेनेबल डेव्हलपमेंट नंदुरबार) यांनी नंदुरबार मध्ये उद्योग विकासाकरिता अनेक कार्य करत असल्याचे आपल्या भाषणामध्ये नमूद केले.

नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागांतून आणि सर्व स्तरातून २०० हुन जास्त जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या सारखे अधिकाधिक कार्यक्रम करण्यासाठी MSME मंत्रालय प्रयत्नशील असून उपस्थित असणाऱ्या उद्योजकांना या कार्यक्रमाचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल, असे मत CASMB तर्फे यावेळी व्यक्त करण्यात आले.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news